श्रीमंत शिवांजलीराजेंच्या उपस्थितीत युवकांचा राजे गटात प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. 18 नोव्हेंबर 2024 | फलटण | तालुक्याच्या पूर्व भागामध्ये असणाऱ्या गुणवरे, खटकेवस्ती गावांमधील भारतीय जनता पार्टीच्या युवक कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये अर्थात राजे गटामध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमधील युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्याने पुन्हा एकदा दीपक चव्हाण हेच आमदार म्हणून निवडून येणार असल्याचे मत यावेळी श्रीमंत शिवांजलीराजे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!