
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त तथा मुधोजी दिनानिमित्त उद्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेच्या सर्व शाखांमधून सर्व २०२२-२३ या वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त शाखा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक, खेळाडू, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम उद्या सकाळी १०.०० वाजता अनंत मंगल कार्यालय, शिंगणापूर रोड, फलटण येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अशोकराव भोईटे यांच्या हस्ते व आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास फलटणकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने केले आहे.