खासदार रणजितसिंह यांच्या उपस्थितीत अ‍ॅड. संदीप कांबळे यांचा भाजपात प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत कोळकीचे सुपुत्र अ‍ॅड. संदीप कांबळे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्याची भाजप कायदा आघाडीचे जिल्हा सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या हातून गोरगरीब, दीनदलित, शोषित, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

या प्रवेशामुळे कोळकीतील अनेक तरुण कार्यकर्ते प्रवेश करतील व कोळकीमध्ये भविष्यात परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

यावेळी लोकसभा प्रभारी राजकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वासराव भोसले, कामगार नेते बाळासाहेब काशिद, सातारा जिल्हा आयटी सेलचे अध्यक्ष संजय घार्गे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!