फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सागर सस्ते तर सचिवपदी धंनजय कदम विजयी


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । फलटण ।  फलटण वकील संघाच्या सन २०२२-२३ वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. सागर मधुकर सस्ते तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. धनंजय कदम हे विजयी झाले तर उर्वरित पदाधिकार्‍यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या.

फलटण वकील संघाच्या सन २०२२-२३ यावर्षीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. सागर मधुकर सस्ते, अ‍ॅड. सुजाता माने- प्रधान व अ‍ॅड. अभिजीत दत्तात्रय यादव हे ३ उमेदवार निवडणुक रिंगनात होते. त्यापैकी अ‍ॅड. सुजाता माने- प्रधान यांनी अ‍ॅड. सागर मधुकर सस्ते यांना जाहिर पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणुक रिंगणात अ‍ॅड. सागर मधुकर सस्ते व अ‍ॅड.अभिजीत दत्तात्रय यादव हे राहिले. दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अ‍ॅड. सागर मधुकर सस्ते हे ११९ मते मिळवून विजयी झाले. तर अ‍ॅड. धनराज दशरथ कदम व अ‍ॅड. अमोल बबनराव सस्ते हे सचिव पदासाठी निवडणुक रिंगणात होते, त्यामध्ये अ‍ॅड. धनराज दशरथ कदम यांना १२१ मते मिळवून ते विजयी झाले. विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फलटण वकील संघाच्या निवडणुकीमध्ये निवडणुक निर्वाचन अधिकारी म्हणुन अ‍ॅड. शिरीन शहा, अ‍ॅड. गणेश तावरे व अ‍ॅड. रामचंद्र घोरपडे यांनी कामकाज पाहिले.


Back to top button
Don`t copy text!