‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 28 जुलै व शुक्रवार 29 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक महेश जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुरानंतर सर्वाधिक धोका साथरोगांचा असतो. कोविड 19 च्या साथरोगातून राज्यातील जनता सावरत असतानाच आता मंकीपॉक्स या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्यात याचा प्रादुर्भाव कमी असला, तरी त्याचे नियंत्रण कसे होत आहे, याबाबत सविस्तर माहिती डॉ. आवटे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली.


Back to top button
Don`t copy text!