
दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । वडगांव, ता.माण । फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे माण मधील जिल्ह्या प्राथमिक वडगांव शाळेचे प्राचार्य संजय खरात यांनी कोव्हिडं 19 ला न जुमानता गेली दीडवर्ष शाळा बंद असल्याने स्वतः च्या आर्थिक खर्चातून पदरमोड करून जवळजवळ 17 मुलांच्या घरातच शाळा सुरू केली.त्यासाठी लागणारे साहित्य पोस्टर्स,तक्ते ,अक्षरे,अंक असे विविध प्रकारचे साहित्य स्वतः तयार करून तसेच लोकांच्या घराच्या भिंती ,अंगण देखील पाडे, मुळाक्षरे , सुंदर अक्षरात लिहिले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात एक आदर्श शाळा म्हणून त्याच्या कामाने वडगांव प्रा.शाळेचा वर्ग न भरता देखील नावलौकिक मिळवून देत आहे. सोबत सातारा जिल्ह्याचे नाव जगभर *घरोघरी शाळा* या उपक्रमाने गाजत असल्याने असे शिक्षण देणारे खरात सर यांचा सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने 29 जून 21 रोजी दुपारी 4 वाजता प्रत्यक्ष घरोघरच्या 13 शाळांना भेट देऊन मुलांना नवीन कपडे ,तसेच ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले गीत चरीत्र ,थोर ऐतिहासिक शूर महिला पुस्तके प्राथमिक स्वरूपात भेट देऊन नंतर त्यांना गावकरी ,पालक यांचे साक्षीने हनुमान मंदिरात थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांची पगडी ,उपरणे व राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानांतर्गत शिवफुलेशाहूआंबेडकर यांची एकत्रित फोटो प्रेम सन्मानपत्र तसेच शाळेला उपयुक्त असे पर्यावरण ,आरोग्य,महापुरुषांचे चरीत्र पासून माजी राष्ट्रपती कलाम यांचे पर्यंत चे 25 पुस्तक संच अध्यक्ष व सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि गावचे उपसरंपच संजय पाटील ,ग्रामसेवक प्रकाश कळसकर यांचे शुभहस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक व उपसरपंच यांनी खरात सरांनी वडगांव शाळेचा पट 17 वरून 1 वर्षात 74 पर्यंत नेला ही कामाची पावती असून यापुढेही त्यांना आम्ही व्यक्तिगत व ग्रामपंचायत मार्फत योग्य सहकार्य करणार आहोत असे म्हंटले व त्यांचे हस्ते उर्वरित कपडे ,सहित्य, खरातसरांकडे देण्यात आले.प्राचार्य हनुमंत अवघडे यांनी देखील मौलिक विचार मांडून आपल्या मित्राचा सन्मान पाहून फुले एज्युकेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ग्रामीण भागात येऊन सत्कार सोहळा अप्रतिम आयोजित केला म्हणून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की खरात सर यांचे गेली वर्षभरापासून सत्कार करण्याचे योजिले पण जिल्ह्याबंदी व इतर कारणाने जमले नाही पण आज शाहु जयंती निमित्त सत्कार करण्याचा योग प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन आला ही आनंदाची बाब आहे. त्यांनी पदरमोड करून हे कार्य अखंड अविरतपणे फुले शाहू आंबेडकर यांचा कृतिशील वारसा जपत चालू ठेवून महाराष्ट्राला एक आदर्श काम करून दाखविले आहे. इतर शिक्षकानी देखील तसे कार्य केले तर मुले नक्कीच पुढे जातील .ढोक पुढे असेही म्हणाले की या शिक्षणामुळे घरातील लहान लहान बालके ,80 वर्षापर्यन्तचे महिला पुरुष पण शिकू लागलेत, ज्या प्रमाणे एक महिला शिकली तर कुटुंब साक्षर होते हे फुले दाम्पत्यानी दाखविले तसेच आज खरातसरांनी अलौकिक असे कार्य केलेले पाहिले व प्रत्यक्ष अनुभविले चे सांगून ढोक यांनी खरात कुटुंबायीचे देखील या सहकार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी माण पत्रकार संघाचे अध्यक्ष आकाश दडस , प्राचार्य हनुमंत अवघडे ,ग्रा. सदस्य सौ.सीमा नागरगोजे ,सामाजिक कार्यकर्ते आबासो ओंबासे व इतर मान्यवर उपस्थित होते.या सर्वांचे ढोक यांनी फेटा बांधून ,पुस्तकसंच व फुले दांपत्य फोटोफ्रेम देऊन सन्मानित केले तर खरात व ग्रामपंचायतने ढोक परिवाराचा हार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून सामूहिक भारताचे संविधान उद्देशिका वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ओंबासे यांनी केले तर आभार बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे संस्थापिका आशा ढोक यांनी मानले.तर मोलाचे सहकार्य मोहन गाढवे,क्षितिज ढोक,श्रद्धा खरात यांनी केले.