कोरोना महामारीत देशात लोकांनी आयपीओत गुंतवले 5 लाख कोटी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१०: कोरोनामुळे देशातील आर्थिक संकटादरम्यान विविध कंपन्यांच्या आयपीओत लोकांचा विश्वास वाढला आहे. ब्रॉकरेज हाऊस व आयपीओ मर्चंट बँकर्सनुसार देशभरात लॉकडाऊननंतर आयपीओत गुंतवणूकदारांनी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बहुतांश गुंतवणूकदारांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या जागतिक महामारीत चांगला परतावा देतील अशी आशा आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान गुंतवणूकदार कमी पैशात सुरक्षित गुंतवणूक समजत आहेत. यामुळे आयपीओत गुंतवणूक वाढत आहेत. आयपीओला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. यात कंपन्या स्वत:ला लिस्टेड करून गुंतवणूकदारांना समभाग विकतात.

यामुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरताहेत आयपीओ


– इक्विटी मार्केटमध्ये येण्यात जोखीम अधिक असते. त्याऐवजी आयपीओत जाेखीम कमी.

– आयपीओ आणणारी कंपनी विश्वासार्हता वाढवण्यासाठी कमी प्रीमियमवर ऑफर देतात. यामुळे फायदा होतो.

– शेअर आल्यानंतर गुंतवणूकदार नफा मिळवत (विकणे-मूल्य जास्त झाल्यावर) परतावा प्राप्त करण्यासाठी मोकळा होतो. असे करून गंुतवणूकदाराला मिळालेली रक्कम- नफा दुसरीकडे गुंतवणुकीचा पर्यायही असतो.

– ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्यांची पॉझिटिव्ह लिस्टिंग होते. नफ्याची शक्यता अधिक असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!