दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२२ । सातारा । संगममाहुली येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ करीता निवडणूक कार्यक्रमानुसार राहुल अनिल शिवनामे यांनी अर्ज सादर केला होता. तो अर्ज न्यायालयाने वैध ठरविला आहे . या छाननीत राहुल शिवनामे, यांच्या अर्जास सुरज राजेंद्र सुर्यवंशी व किरण बाळकृष्ण सुर्यवंशी यांनी तीन आपत्ये असल्याच्या कारणे हरकत घेतली. सदर हरकतीच्या अनुषंगाने शिवनामे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविले गेले. त्यामुळेच विरोधी उमेदवार सुरज सुर्यवंशी बिनविरोध निवडूण आले. मात्र न्यायालयाने संगम माहुली ग्रामपंचायत वॉर्ड क्रं दोनची पुन्हा पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत .
तहसीलदारांनी दिलेल्या सदर आदेशाच्या विरुद्ध इच्छुक उमेदवार शिवनामे, यांनी या निर्णयाविरुद्ध दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने नुकताच निकाल पारित केलेला आहे.
सदर निकालाच्या अनुषंगाने संगममाहुली ग्रामपंचायतीच्या विवाद वॉर्ड क्रमांक २ ची निवडणूक रद्द करण्यात आली व राहुल अनिल शिवनामे, यांनी त्या वॉर्ड मधून दाखल केलेला त्यांचा निवडणूक अर्ज न्यायालयाने वैध ठरवलेला आहे.न्यायालयाने सातारा तहसीलदारांना ग्रामपंचायत अधिनियम कलम ११ अन्वये सदर वॉर्ड क्रमांक २ ची फेरनिवडणूक घेणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर निकालाच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय यांनी अनेक निवाडे पारीत केलेले आहेत ज्याचा उल्लेख सदर निकालपत्रात आढळतो. परंतु सदर कायद्यातील कमतरता न्यायालयाने स्पष्ट करताना असताना देखील संबंधीत महसुली अधिकारी अशा हरकतींच्या मुद्दांवर त्याकडे कानाडोळा करतात. आवश्यक अभ्यास व अवलोकन करत नाहीत. अशा ढोबळमानाने दिलेल्या आदेशामुळे लोकशाहीतील पहिल्या पायरीची निवडणूक म्हणजेच ग्रामपंचायत निवडणूकीमधून अनेक होतकरू व सजग ग्रामस्थ आपल्या न्यायहक्कांपासून वंचित राहतात. त्यांना कोर्ट कचेरी करणे परवडणारे नसते, त्यामुळे सदर अधिकाऱ्यांनी दिलेले चुकीचे निर्णय पायंडा पडतात ही बाब या निमित्ताने अधोरेखीत झालेली आहे.
सदर श्री. राहुल अनिल शिवनामे, यांचा पुरेशा अभ्यासाशिवाय घाई गडबडीने अर्ज छाननीमध्ये बाद ठरविणाऱ्या तत्कालीन तहसीलदार श्रीमती आशा होळकर व निवडणूक निर्णय अधिकारी उल्हास रामचंद्र अगसर यांची चौकशी करावी व आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदणाद्वारे करणार असलेबाबतची माहिती शिवनामे, यांनी पत्रकाद्वारे दिली. शिवनामे यांच्यावतीने या कामी ऍड प्रशांत पोपटराव खामकर यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिले.