
स्थैर्य, सातारा, दि. ०४ : कोरोनाच्या रूपाने आपल्यावर कोसळलेल्या अभूतपूर्व संकटाचा आपण एकत्रितपणे आणि जिद्दीने सामना करीत आहोत. मात्र संकटाचे स्वरूप आणि टप्पे जसजसे बदलत जातील तसतसी आपल्यालाही रणनीती बदलावी लागणार आहे. होम आयसोलेशन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे मत सहकार मंत्री तथा सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.