तरडगाव मध्ये माऊलींचा प्रतिकात्मक पालखी सोहळा भक्तीभावात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । तरडगांव । संजय किकले । ‘विरह माऊलींच्या पालखी सोहळ्याचा’ या भावनेतून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा प्रतिकात्मक पालखी सोहळा तरडगांव (ता.फलटण) येथे पार पडला.

यावेळी माऊलींच्या पालखीच्या आगमनाचे व प्रस्थानाचे भजन संपन्न झाले. त्यानंतर तरडगाव हद्दीतील चांदोबचा लिंब येथे विधीपूर्वक भजन, हरिपाठ, समाज आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. तद्नंतर तरडगावकरांच्या ताब्यात माऊलींची पालखी सुपूर्द करुन माऊलींच्या पादुका भजन – किर्तनाच्या गजरात पालखी तळावर नेण्यात आल्या. यावेळी तरडगाव ग्रामपंचायत सरपंच, मान्यवर व ग्रामस्थांच्यावतीने पादूकांना अभिषेक घालून पुजा, हरीपाठ, समाज आरती संपन्न झाली. यावेळी मंदार संजय किकले यांच्यावतीने केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!