दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । सातारा । आंधळी जिल्हा परिषद गटातील शिरवली विकास सेवा सोसायटिंचा निवडणुकीत निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाजूने लागला आहे. शिरवली विकास सेवा सोसायटी मध्ये माजी सनदी आधिकरी प्रभाकर देशमुख यांचा नेतृत्वात लढविण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाजूने लागला आहे.
१३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप शिवसेना युती अशी दुरंगी लढत झाली. यामध्ये 13 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला तर विरोधी भाजप शिवसेना युतीला एक ही जागा जिंकता आली नाही .विशेष म्हणजे जिल्हा बँक निवडणुकीत या सोसायटीचा ठराव भाजपचा होता त्यामुळे आमदार गोरेच बाजी मारतील असे चिञ होते माञ राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली. प्रताप जगदाळे ,भाऊसाहेब जगदाळे, रामचंद्र आण्णा जगदाळे, रामचंद्र ज्ञानु जगदाळे, सुरेश जगदाळे, हनुमंत जगदाळे, धनाजी फडतरे, संपत जगदाळे, पुष्पा जगदाळे, मनुबाई जगदाळे, उत्तम माने, आप्पा रुपनवर, जोती खरात विजयी झाले. विकास सेवा सोसायटी ही गाव खेड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आधार असतो, तेथून मिळालेल्या कर्ज पुरवठ्यमुळे शेतकऱ्याला मोठी मदत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकऱ्यांचे नाते अतिशय घट्ट असून या सोसायट्यांचा माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे हा पक्षाचा प्रमुख उद्देश राहील अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांनी दिली. त्यावेळी तुकाराम जगदाळे उपसरपंच, योगेश घाडगे, दत्तात्रय जगदाळे, तायाराम जगदाळे, अशोक जगदाळे, प्रतीक जगदाळे, प्रशांत जगदाळे, युवा वर्ग उपस्थितीत होता.