शाहूनगर भागात राजकीय दबाव टाकून घंटागाडीचा ठेका नगराध्यक्षांच्या दालनातच – आरोग्य निरिक्षकाचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । सातारा । शाहूनगर भागत राजकीय दबाव टाकून  काही स्थानिक पुढारी घंटागाडी चालवण्याचा ठेका घेत असल्याचा गौप्यस्फोट आरोग्य निरिक्षक यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनातच केला. यामुळे नगराध्यक्षा यांच्यासह शाहूनगर भागातील कचऱ्याची तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकही अवाक झाले.

शाहूनगर भागातील समर्थ कॉलनी, मंगलाई कॉलनी, नलवडे वसाहत, गणेश कॉलनी, गुरुकृपा कॉलनी व हिलटॉप कॉलनी येथे गेल्या 3 महिन्यांपासुन घंटागाडी येत नसल्याने या परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागात नगरपरिषदेने तत्काळ उपाययोजना करण्यासाठी या भागातील नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक ही उपस्थीत होते. नागरिकांनी व नगराध्यक्षानी या भागात घंटागाडी का जात नाही असा प्रश्न विचारला असता आरोग्य निरिक्षक यांनी या भागातील स्थानिक पुढारी राजकीय दबाव टाकून घंटागाडीचा ठेका घेत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटानंतर नगराध्यक्षा यांच्या दालनात तक्रार करण्यात आलेल्या नागरिक मात्र आवाक झाले. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी उद्या शाहूनगर भागात पाहणी करण्यासाठी येत असल्याचे आश्वासन देत या भागातील समस्या तत्काळ सोडवन्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

मात्र, आरोग्य निरिक्षक यांनी केलेल्या खळबळजनक खुलासामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कोण राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्न करत आहेत याची चर्चा नगरपालिकेत सुरू झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!