साताऱ्यात खैर प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा वन विभागाच्या भरारी पथकाने पुणे बेंगलोर महामार्गावर खैर जातीच्या सोली व लाकडाची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई केली तसेच ते दोन ट्रक ताब्यात घेऊन तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी खैरच्या सोलीव लाकडाची तस्करी करणारे ट्रक सातारा वरून चिपळूणच्या दिशेने जाणार असल्याची माहिती सातारा विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वन विभागाच्या भरारी पथकाने रात्रगस्त दरम्यान सापळा रचला अतित गावच्या हद्दीत दोन ट्रक पकडून त्याची तपासणी केली असता या तपासणीमध्ये भरारी पथकाला खैर प्रजातीच्या सुमारे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

यावेळी केलेल्या अधिक चौकशीमध्ये संबंधित लाकूड अवैधरित्या चोरट्या पद्धतीने पाठवले जात असल्याची माहिती समोर आली. वनविभागाने दोन्ही ट्रक सह वीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालक शेषनाथ जयस्वाल राहणार उत्तर प्रदेश व मोहम्मद खान राहणार गुजरात यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वन विभागाच्या भरारी पथकाचे वनक्षेत्रपाल डोंबाळे यांनी दिली आहे


Back to top button
Don`t copy text!