साताऱ्यात झेंडू शंभर रूपये किलो शाही सीमोल्लंघनासाठी शाहूनगरी सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | अशुभांवर मात करणाऱ्या शाही दसऱ्याच्या सीमोलंघनासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे . सातारा शहरात झेंडू आणि आपट्याच्या पाने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती . साताऱ्यात शंभर रूपये किलोने झेंडूच्या फुलांची विक्री झाली.

साताऱ्यात यंदा आदिशक्तीच्या जागराचा उत्सवं नऊच दिवस चालला. सुवासिनिंनी गुरुवारीच दशमीच्या धपाट्यांचा आणि विविध भाज्यांचा नैवैद्य दाखवून उपवासाची सांगता केली. खंडेनवमीला शस्त्र पूजनाचे महत्व असल्याने साताऱ्यात विजयाद्शमीच्या पूर्वसंध्येला व्यापारी व नागरिकांनी आपल्या वाहनांची व यत्रांची स्वच्छता करून त्याची मनोभावे पूजा केला. विजयादशमीसाठी झेंडूच्या माळांचे तोरण घरोघरी दारावर लावले जाते . यंदा अतिवृष्टीमुळे गेंदेदार झेंडू अभावानेच पहायला मिळाला. बारामती पुरंधर तसेच लोणंद निरा व खंडाळा येथून आलेल्या झेंडूचा भाव सायंकाळी उशिरापर्यंत 110 रूपये किलोवर पोहचला होता .नागरिकांनी गोलबाग व राजवाडा परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. साताऱ्याचा शाही दसरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. पोवई नाक्यावर पारंपारिक पध्दतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शस्त्र पूजनं करण्यात येणार आहे. मात्र, करोना संक्रमणाच्या कारणामुळे यंदाचे सीमोल्लंघन अत्यंत साधेपणाने करण्यात येणार असल्याचे जलमंदिर वरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!