दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात एकूण 259 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी मध्ये सत्तांतराचे अनेक राजकीय साद पडसाद दिसून आले. या निवडणुकीत 60 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या निवडणुकीसाठी 4542 उमेदवार रिंगणात होते सुमारे चार लाख 50 हजार मतदारांपैकी तीन लाख 55 हजार 254 मतदारांनी हक्क बजावला मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकांच्या झालेल्या मतमोजणीनंतर शिंदे गट आणि भाजपा युतीने राष्ट्रवादीला कडवी टक्कर दिल्याचे चित्र स्पष्ट झाले तर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला बालेकिल्ला सांभाळताना प्रचंड कसरत करावी लागली या धक्कादायक निकालांमध्ये कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी चार जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवल्याने पालकमंत्री शंभूराजे यांच्या अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली महाबळेश्वरच्या लाखवड ग्रामपंचायतीत एकनाथ शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंच पदी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाला धक्का बसला तर महाबळेश्वर तालुक्यातील वेंगळ ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाच्या शोभा संकपाळ विजयी झाल्या आमदार मकरंद पाटील यांचा हा राजकीय सेटबॅक मानला जात आहे . माळ्याची वाडी ग्रामपंचायत मध्ये अरुण कापसे यांना २५७ मते मिळाली त्या विशाल कापसे यांना ९१ मध्ये मिळाली अरुण कापसे यांनी पुन्हा एकदा एक हाती सत्ता राखल्याने कापसे गटाची वर्चस्व सिद्ध झाले आहे अपशिंगे ग्रामपंचायत भाजप गटाकडे गेली असून भाजपच्या तुषार रिकाम्यांना 912 तर राष्ट्रवादीच्या संतोष निकम 832 मध्ये पडली अपशिंगे ग्रामपंचातीमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे माण तालुक्यामध्ये महिमानगड ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेली असून धुळदेव ग्रामपंचायत वर भाजपने वर्चस्व राखले आहे सातारा तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत 4653 मतदान होते येथे महेश शिंदे गटाच्या सरपंच पदी वैशाली साळुंखे विजयी झाले आहेत शिंदे गटातील सातारा तालुक्यातील एन्ट्री ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे राष्ट्रवादीच्या कांचन साळुंखे यांचा पराभव झाल्याने झाल्याने शिवेंद्रराजे गटाला येथे धक्का बसला आहे पाटण तालुक्यातील नाटोशी ग्रामपंचायत देसाई गटाकडे कायम राहिली तर पाटण तालुक्यातील म्हावशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे वर्चस्व राखले सातारा तालुक्यात काशीळ ग्रामपंचायत सत्तांतर झाले भाजपने येथे आपली सत्ता राखली तर राष्ट्रवादीला हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला कोरेगाव तालुक्यातील रामोशी वाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे कायम राहिली येथे शशिकांत शिंदे गटाने आठ शून्य असा एकतर्फी विजय मिळवला पाटण तालुक्यातील निवकणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले तर सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली या गावात आमदार महेश शिंदे यांनी केलेली राजकीय पेरणी यशस्वी ठरली आणि येथे शिंदे गटाची सत्ता कायम राहिली आहे आमदार शशिकांत शिंदे यांच्या अनेक सत्ता केंद्रांना महेश शिंदे यांनी धक्का दिल्याने पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध शिंदे हा सातारा तालुक्यातील पण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज ड्रामा चर्चेचा विषय ठरला आहे कराड तालुक्यातील मनव आणि जळगाव येथे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम राहिली तर दुशेरे आणि या ग्रामपंचायती भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी राखल्या आहेत अतुल भोसले यांनी या ग्रामपंचायत साठी प्रचंड मेहनत घेतली होती राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाळासाहेब पाटील यांनी हिंगनोळी हेळगाव पाडळी अंतवडी येथे पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे येथे बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला.