सातारा जिल्ह्यात २ हजार २१८ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले : विभागीय आयुक्त सौरभ राव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, पुणे, दि. ०४ : पुणे विभागातील 75 हजार 812 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 215  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार  328 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 64.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के इतके आहे. या पैकी सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 389 रुग्ण असून 2 हजार 218  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार  35 आहे. कोरोनाबाधित एकूण 136  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी  माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील  92 हजार 880 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित  63 हजार 930 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार  821 आहे.  पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 129  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  68.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार   499 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 487 , सातारा जिल्ह्यात 161, सोलापूर जिल्ह्यात 193 ,  सांगली जिल्ह्यात 347  तर कोल्हापूर जिल्ह्यात 311 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सोलापूर जिल्हयातील 9 हजार 239 कोरोना बाधीत रुग्ण असून 5   हजार  439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 282 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 252 रुग्ण असून 955 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या  2 हजार  203 आहे. कोरोना बाधित एकूण 94  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 7 हजार  455 कोरोना बाधीत रुग्ण असून  3 हजार 270 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3   हजार  987 आहे. कोरोना बाधित एकूण 198  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख  99 हजार  788 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  1  लाख 17 हजार 215 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

( टिप : दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!