सासकलमध्ये जिल्हा परिषद शाळेत बसतात एकाच वर्गात दोन दोन वर्ग !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असता सासकल गावाने का करायचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा? हा प्रश्न पडला आहे.गावाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही.गावातील जिल्हा परिषद शाळेला पर्याप्त वर्गखोल्या नाहीत.वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती नाही.किती दिवस सोसावी ही घोर नाकेबंदी!येवढी वर्षे गाव या मागण्या करत आहे पण राजकारणी लोकांना व प्रशासनाला याचे काहीही देणे घेणे नाही.जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या गावात त्याच्या संबंधित मतदार असलेल्या गावात अनेक गोष्टी सुस्थितीत असताना तिथे कामे प्रगती पथावर आहेत.मग सासकल गावाने तुमचे काय घोडे मारले आहे?

आज जिल्हा परिषद शाळा शैक्षणिक गुणवत्तेत चांगले काम करत असून शाळा सुधार संघटन हे शाळेच्या अनेक भौतिक सुविधा देण्यासाठी आपल्या कमाईतील हिस्सा शाळेसाठी देत असताना शासन प्रशासन का उदासीन आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलमधील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत कुठेही काम नाही.आज एका एका वर्गात दोन दोन वर्ग बसत असून त्याचा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.शाळेच्या तिन्ही खोल्या धोकादायक असल्याचा सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण ने दाखला दिला आहे. अनेक वेळा शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा दुरुस्तीची मागणी केलेली असतांना प्रशासन का निर्णय घेत नाही.आज आपण स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या मुलभूत गरजांचे काय?यावर प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा.अशी ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी मागणी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!