दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२३ । सातारा । पुणे विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नेतृत्वाखालील सातारा संघाने सांस्कृतिक गटात विजतेपद पटकावले आहे.
कोल्हापूर पोलीस कवायत मैदानवर दि.24 ते दि.26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत स्पर्धा झाली. या स्पर्धेत रिले, जलतरण, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल अशा विविध क्रीडा स्पर्धासह सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणाच्या स्पर्धा झाल्या.
या स्पर्धेमध्ये कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना’ हे गीत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी स्वतः गावून सातारा महसूल विभागातील स्पर्धेत भाग घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली. सांस्कृतिक विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून सातारा, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांनी सभाग घेतला.
सातारा महसूल विभागातर्फे संघर्ष सावित्री ज्योतिचा सांगणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची निर्मिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निर्मिती सहायक अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, दिग्दर्शन उपजिल्हाधिकारी रा. शि. भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी दिग्दर्शक म्हणून मकरंद गोसावी, पंकज काळे, नृत्यदिग्दर्शक अभिषेक विटेकर व संगीत दिग्दर्शक म्हणून अरविंद मोटे यांनी काम पाहिले.