दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरासह तालुक्यामधील विविध हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी अमाप हे डॉक्टर आकारत आहेत. त्यासोबतच जर रुग्णाला पुढील उपचारासाठी ॲडमिट करावे लागले तर ॲडमिट करून त्यामध्ये इतर चार्जेस म्हणजेच की नर्स चार्ज असेल किंवा इतर विविध चार्जेस त्याला लावले जातात. व हे रुग्णास डिस्चार्ज वेळी निदर्शनास येते, तरी फलटण शहरासह तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी आपली तपासणीची फी ₹ १०० च घ्यावी, अशी मागणी कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
याबाबत कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांनी फलटण तालुका डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षांना याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.
निवेदनावर सनी काकडे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड, अमर झेंडे, सिद्धार्थ अहिवळे, सुरज भैलुमे, रोहित अडागळे, आदित्य पाटोळे यांचे नाव व स्वाक्षर्या आहेत.