स्थैर्य, फलटण, दि. २८ : फलटण शहर व तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिम आरोग्य व अन्य फ्रंट लाईन वर्कर यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीरितीने राबविण्यात येत असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने आतापर्यंत सुमारे ३७% लाभार्थ्यांना पहिला आणि सुमारे पाच टक्का लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याचे गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी सांगितले.
फलटण शहर व तालुक्यात ४५ ते ५९ वयोगटातील ६९ हजार ४१७ आणि ६० वर्षे व त्यावरील वयाचे ५१ हजार असे एकूण १ लाख २० हजार ४१७ लाभार्थी आहेत. त्यापैकी बरड प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील ९ हजार ७१७ आणि ६० वर्षावरील ७ हजार ११० असे एकूण १६ हजार ८२७, बिबी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील ५ हजार ३९८ आणि ६० वर्षावरील ५ हजार ७२४ असे एकूण ११ हजार १२२, गिरवी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील ९ हजार २१८ आणि ६० वर्षावरील ७ हजार ६७३ असे एकूण १६ हजार ९७१, राजाळे प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील ११ हजार ४१४ आणि ६० वर्षावरील ८ हजार २६५ असे एकूण १९ हजार ६७९, साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील १० हजार ३०७ आणि ६० वर्षावरील ५ हजार १७८ असे एकूण १५ हजार ४८५, तरडगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील ८ हजार ०३३ आणि ६० वर्षावरील ६ हजार ६५० असे एकूण १४ हजार ६८३, नागरी आरोग्य सेवा केंद्र फलटणच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील १५ हजार २५० आणि ६० वर्षावरील १० हजार ४०० असे एकूण २५ हजार ६५० लाभार्थी असल्याचे गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
तालुक्यातील सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय फलटण आणि शंकर मार्केट फलटण येथील नागरी आरोग्य सेवा केंद्र येथे दररोज लसीकरण करण्यात येते. त्याशिवाय प्रा. आरोग्य उप केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पूर्व नियोजन करुन त्याबाबत ग्रामस्थांना पूर्वकल्पना देऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देतानाच काही वेळेस लसीचा पुरवठा कमी झाल्यास पूर्व नियोजन कोलमडल्याने ग्रामस्थांना लसीकरण केंद्रावरुन परत जावे लागत असल्याचे गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी सांगितले.
फलटण शहर व तालुक्यात ४५ वर्षावरील स्त्री-पुरुष लाभार्थ्यांची संख्या १ लाख २० हजार ४१७ इतकी असून त्यापैकी आतापर्यंत ४५ हजार २३५ पहिला आणि ५ हजार ८६३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे, त्यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील ३९ हजार ५१ लाभार्थी पहिला डोस व ४ हजार ११० लाभार्थी दुसरा डोस घेतलेले असल्याचे गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.