म्हसवड शहरात आणखी दोघांना बाधा, दोन्ही ही बालके

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड दि.२ : म्हसवड शहरात कोरोनाची साखळी दररोज वाढु लागली असुन दि.१ रोजीच्या रात्री उशीरा आलेल्या कोरोना अहवालामध्ये म्हसवड शहरातील दोन बालकांचा समावेश असल्याने म्हसवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरातील ब्रेक झालेली कोरोनाची साखळी पुन्हा एकदा सुरु झाल्याने शहरात दररोज रुग्ण सापडु लागले असुन कोरोनाची ही साखळी आता आणखी किती लांबणार याचीच चिंता प्रशासनासह म्हसवडकरांना सतावत आहे.

दोन दिवसांपुर्वी शहरातील पती पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने त्यांच्या ५ निकटवर्तीयांना क्वॉरंटाईन करीत त्यांचे स्वाईप तपासणी साठी पाठवले होते त्यामध्ये दोनजणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे, तर अन्य एक ठिकाणी सापडलेल्या बाधिताच्या घरातील सदस्यांचे स्वाईप अद्याप तपासणीसाठी पाठवण्यात आले नसल्याने तुर्तास तरी शहरात दोन दिवसांत ५ रुग्ण संख्या झाली असुन पुढील दोन दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडुन वर्तवली जात आहे.

दरम्यान यापुर्वी शहराच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत होते आता मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडु लागल्याने शहरवासियांच्या मनामध्ये धडकी भरली आहे. दि. १ रोजी रात्री उशीरा आलेल्या अहवालामध्ये ३ व ७ वर्षीय बालकांचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे तर यापुर्वी कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला व म्हसवडकर जनतेला यश आले होते ते यश आत्ताही लवकर मिळावे व शहर कोरोनामुक्त व्हावे यासाठी सर्व म्हसवडकर जनता आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार काम करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रिपीट अँन्टेजिन किटद्वारे होणार तपासणी 

आजवर संशयीत व्यक्तींचे स्वाईप तपासणी साठी फलटण, सातारा येथे पाठवले जात होते त्याठिकाणी त्या स्वाईपची तपासणी होवुन त्याबाबतचा अहवाल प्रत्येक आरोग्य केंद्राकडे पाठवला जात होता, यापुढे आता अशा संशयीतांची तपासणी रिपीट अँन्टेजिन किट द्वारे केली जाणार असुन ही तपासणी म्हसवड व दहिवडी येथील आरोग्य केंद्रातच केली जाणार आहे.

एका तासात मिळणार अहवाल 

बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीयांचे स्वाईप आता रिपीट अँन्टेजिन किट द्वारे तपासले जाणार असुन त्याचा अहवाल हा एका तासात आरोग्य केंद्राला प्राप्त होणार आहे, अशा प्रकारची ३० किट म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाली आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!