मध्य प्रदेशात शिवराजसिंह सरकार लव्ह जिहादवर कायदा आणणार; 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१७: मध्य प्रदेशात लव्ह जिहादबाबत
गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे विधान समोर आले आहे. मध्य प्रदेशात
सातत्याने समोर येत असलेल्या लव्ह जिहादची प्रकरणे थांबविण्यासाठी राज्य
सरकार कायदा आणणार आहे. सरकार यासंदर्भात धर्म स्वातंत्र्य कायदा करीत आहे.
त्यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक आणले जाईल. कायदा आणल्यानंतर
अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल आणि 5 वर्षांची कठोर शिक्षा
दिली जाईल. यामध्ये आमिष देणे, प्रलोभन देणे आणि धमकी देणे अपराध ठरेल. असे
गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले.

मदत करणारे देखील ठरणार मुख्य आरोपी

नरोत्तम
लव्ह जिहाद कायद्याबाबत बोलताना म्हणाले की, या कायद्यांतर्गत अजामीनपात्र
कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल आणि 5 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरदूत
असेल. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांत मदत करणारे लोकांनी देखील मुख्य आरोपी
केले जाईल. त्यांनी आरोपीप्रमाणेच शिक्षा दिली जाईल. यासोबतच लग्नासाठी
धर्मांतरण करणार्‍यांनाही शिक्षा करण्याची या कायद्यात तरतूद असेल.

जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महिना अगोदर अर्ज करणे आवश्यक

अनेक
प्रकरणांमध्ये तरुणी स्वेच्छेने धर्मांतर करून लग्न करू इच्छित असल्याचे
अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले. अशी प्रकरणे लक्षात घेता कायद्यात अशीही
तरतूद असेल की एखाद्याला स्वेच्छेने लग्नासाठी धर्मांतर करायचे असेल तर
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महिन्यापूर्वीच अर्ज करावा लागेल. धर्मांतरण
करून लग्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज सादर करणे बंधनकारक असेल
आणि जर अर्ज न करता धर्मांतर केले तर कठोर कारवाई केली जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!