लोणंद बाजारात कांदा दरात घट आवक ११,००० पिशवी तर दर १८०० रुपयावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । लोणंद । लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांदयाची आवक ११,००० पिशवी झाली असुन कांद्याचे दर १८०० रुपये प्रति क्विटंल पर्यत निघाले असुन कांदयाच्या दरामध्ये सलग दुसर्‍या आठवड्यात घट होत असल्याने कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणताना दिसत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी विक्रीसाठी राज्यात प्रसिध्द असुन लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, वाई, पुरदंर, बारामती आदी तालुक्यामधुन मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस कांदा उत्पादक शेतकरी आणतात, लोणंद परिसरात पिकणाऱ्या दर्जेदार कांद्यामुळे या कांद्याचा देशभरात नावलौकिक असुन चवीला चांगल्या असलेल्या लोणंद बाजार समितीमध्ये येणाऱ्या या कांद्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे. कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना साठवून ठेवता येत नाही. उन्हाळी गरवा कांदा फक्त महाराष्ट्रच पिकतो , त्यामुळे नंतर नवीन कांदा बाजारात येईपर्यत कांदयाचे दर मोठया प्रमाणात वाढतात. मात्र गेल्या आठवड्यापासून नवीन कांदा मार्केटला येऊ लागल्यानंतर बाजारात पन्नाशी पार गेलेला कांदा पंचवीस ते तीस रुपये किलोने ग्राहकांना मिळतोय. मात्र बाजारात मागील आठवड्यापासून स्थानिक कांद्याची आवक वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

आज गुरुवार दिनांक लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ११,०००/- नव्या कांद्याची आवक झाल्याने नंबर १ च्या लाल कांद्याचे भाव १५०० ते १८०० रू. इतके राहिले. तर २ नंबर लाल कांदा १२०० ते १५०० तर गोल्टी लाल कांदा ५०० ते १२०० असे भाव निघाले असलेची माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
लोणंद बाजार समिती मधे शेतकऱ्यानी कांदा चांगला वाळवून , निवडून प्रतवारी करुन विक्रीस आणावा असे आवाहन सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

तर जनावरे बाजारात म्हैस ५५०००/- ते ६२०००/- (आवक –  ५ नग) गाय ५००००/- ते ७००००/- ( आवक १५ नग) शेळ्या ५०००/- ते १४०००/- ( आवक- १२०० नग ) मेंढ्या ६०००/- ते १९०००/- ( आवक- १८०० नग. ) बोकड १२००/- ते ३५०००/- ( आवक ८०० नग ) असे दर राहिले.


Back to top button
Don`t copy text!