साहेब सदैव तुमच्या सोबत….कोरेगावात आमदार महेश शिंदे समर्थकांचा हात उंचावून पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । कोरेगाव । राज्यातील सत्ता संघर्षात मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर रणांगणात थेटपणे उतरलेल्या आमदार महेश शिंदे यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आमदार महेश शिंदे यांनी नेमकेपणाने का भूमिका घेतली, त्यांच्यावर का वेळ आली, याबाबत प्रमुख पदाधिकारी व सहकार्‍यांनी आज समर्थकांना माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत आता मागे हटायचे नाही, साहेब सदैव तुमच्या सोबत.. असे म्हणत समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत हात उंचावून पाठिंबा दिला.

यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार महेश शिंदे यांनी भूमिका घेतली असून, त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट केले. मार्केटयार्ड ते शिवतिर्थ हुतात्मा स्मारकपर्यंत रॅली काढत समर्थकांनी जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मतदारसंघात काम करत असताना विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील शिवसेनेसह अपक्ष आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळातील तब्बल सहा कॅबिनेट मंत्री व तीन राज्यमंत्र्यांनी या भूमिकेस पाठबळ दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरीने आमदार महेश शिंदे हे रणांगणात थेटपणे उतरले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार महेशदादा शिंदे साहेब विचारमंचच्यावतीने समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

काडसिध्देश्‍वर कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. सौ. अरुणाताई बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, राहूल कदम, माजी सदस्या सौ. अर्चनाताई केंजळे-देशमुख, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम झांजुर्णे, पुसेगावचे माजी सरपंच रणधीर जाधव, खटावचे उपसरपंच राहूल पाटील, यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकासाभिमूख कायापालट करण्याच्यादृष्टीने आमदार महेश शिंदे यांनी कायम भूमिका घेतली आहे. त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांना आपलेसे केले, कोणताही व्यक्तीगत स्वार्थ न ठेवता, त्यांनी राजकीय भूमिका केवळ आणि केवळ मतदारसंघाच्या हितासाठी घेतली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेले पाच ते सहा दिवस शिवसेनेसह विरोधकांकडून आमदार महेश शिंदे यांच्यावर करण्यात येत असलेल्या चुकीच्या टिकाटिपण्णीवर बोलताना मान्यवरांनी विनाकारण राजकारणातून टीका करणार्‍यांचा नजिकच्या काळात समाचार घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

बाजार समिती आवारात सकाळपासून ढोलताशांच्या निनादात कार्यकर्ते जमा होत होते. भर उन्हात खुले व्यासपीठ होते. कार्यकर्ते समर्थनाचे फलक उंचावून जोरजोरात घोषणा देत होते. डॉ. सौ. अरुणाताई बर्गे यांच्या भाषणाला सुरुवात होताच, पावसाला सुरुवात झाली, मात्र एकही कार्यकर्ता जागचा हलला नाही. सर्वांनी हात उंचावून आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला. माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी आभार मानले.

टिका करणार्‍यांचा स्क्रु ढीला झालाय…. !
सुनील खत्री यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका करणार्‍यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. कोरेगावातून आमदार महेश शिंदे यांना जरुर शिवसेनेने उमेदवारी दिली, त्याअगोदर ते भाजपचे गेले सहा ते सात वर्षे अहोरात्र काम करतच होते. महायुतीतून ते विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयासासाठी शिवसैनिकांबरोबरच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वाभिमानी विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. केवळ सत्ताकारणात शिवसेना वेगळी झाली म्हणून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते कसे सोडू शकतात, ज्यांनी आपल्यासाठी त्याग केलाय, कष्ट केलेत, त्यांची साथ सोडणे योग्य नव्हते व नाहीच, मात्र हे लक्षात न घेता, केवळ टीका टीपण्णी करणार्‍यांना आज मी स्पष्टपणाने सांगतो की, जे टिका करतात, त्यांचा स्क्रु ढीला झाला आहे. राजकारण आणि समाजकारणातील जुने दाखले देत सुनील खत्री यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पोपट करपे, विजयराव घोरपडे, हणमंतराव जगदाळे, सचिन शेलार, किशोर फाळके, नवनाथ केंजळे, शहाजी भोईटे, कुमार फाळके, रत्नदीप फाळके, अजित खताळ, पोपट भोज, भरत साळुंखे, संतोष जाधव, मनोज अनपट, भरत मुळे, अभयराजे घाटगे, निलेश नलावडे, आप्पा माने, शरद भोसले, बबनराव गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गरविकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह आमदार महेशदादा शिंदे साहेब विचारमंचचे पदाधिकारी व नगरविकास आघाडीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक ऍड. शशिकांत क्षीरसागर, राहूल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, स्नेहल आवटे, वनमाला बर्गे, शीतल बर्गे, संगीता बर्गे, अनिकेत सुर्यवंशी, बाबा दुबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!