
शाहूवाडी तालुक्यातील सर्वाधिक 18 रुग्ण : रुग्ण संख्या 134
स्थैर्य, कोल्हापूर, दि. 19 : कोल्हापूर जिल्ह्यात रेड झोनमधून येणार्यांमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी 52 रुग्णांची भर पडली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी शतक पार होवून 135 वर पोहोचली आहे. मंगळवारी सकाळी कोरोग्रस्तांची संख्या 83 होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत यामध्ये नव्या 40 रुग्णांची भर पडली. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नाकेबंदी अधिक कडक करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. मात्र लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर तसेच जिल्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांना प्रवेश देण्यास सुरुवात केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. सोमवारी रात्री जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 83 होती. मंगळवारी एकाच दिवसांत 52 नव्या रुग्णांची भर पडली.
आजपर्यंत कोल्हापूरात आढळलेल्या सर्वाधिक रुग्णांची ही संख्या आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पुणे येथील बी. जे मेडिकल कॉलेज प्रयोगशाळेतून 35 अहवाल प्राप्त झाले. तर सीपीआर रुग्णालयातून 4 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्वच 40 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 25 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे.
10 वर्षाखालील 5 बालकांचा समावेश
मंगळवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत भर पडून रुग्णांची संख्याने शतक पार केले. मंगळवारी प्राप्त अहवालामध्ये 10 वर्षाखालील 5 बालकांचा समावेश आहे. यामध्ये 7 वर्षाचा मुलगा, 9 वर्षाची मुलगा, 3 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाची मुलगी, 9 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. 11 ते 20 वर्षे – 13, 21 ते 50 वर्षे – 58, 51 ते 70 वर्षे – 7 तर 71 वर्षे – 0 आदी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे.
नवीन समिती स्थापन
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. तेजस्वीनी सांगरुळकर, जिल्हा परिषदेच्या सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांची नेमणूक दररोज कोरोना रुग्णांच्या आकडेवारी अद्ययावत ठेवण्यासाठी करण्यात आली आहे.
तीन टप्प्यात 7 हजार 253 बेडचे नियोजन
जिह्यात स्थापन करण्यात आलेल्या 41 कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे 7 हजार 253 बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार तीन टप्प्यामध्ये याची उभारणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 3 हजार 142 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. 4 कोव्हिड केअर सेंटरमधून ओपीडी सुरू केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.