
स्थैर्य, सातारा, दि. १०: येथील इंदिरानगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून एकावर कोयत्याने हल्ला करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, इंदिरानगर, सातारा येथे सुभाष रघुनाथ शिंदे वय 52 हे घरासमोर थांबले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून सुनील पवार, सनी पवार व सुरेश पवार सर्व रा. इंदिरानगर, सातारा यांनी पाठीमागून येवून फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार मेचकर तपास करत आहेत.