भारतात सक्रिय प्रकरणे कमी होऊन 1.57 लाख झाले, यामध्ये भारत जगभरात 17 व्या क्रमांकावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.३: देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होणे सातत्याने सुरू आहे. मंगळवारी 11,000 नवीन रुग्ण आढळले. 14,256 बरे झाले आणि 113 जणांचा मृत्यू झाला. आता 1.57 लाख अॅक्टिव्ह केस आहेत. म्हणजेच या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अॅक्टिव्ह केसच्या प्रकरणामध्ये भारत आता जगात 17 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 1.07 कोटी संक्रमित आढळले आहेत. 1.04 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.54 लाख संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात मंगळवारी 1,927 लोक कोरोना संक्रमित आढळले. 4,011 रुग्ण बरे झाले आणि 30 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20.30 लाख केस समोर आल्या आहेत. यामध्ये 19.36 लाख संक्रमित बरे झाले आहेत. तर 51,139 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या 41,586 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान कोरोनामुळे देशात जनगणनाचा पहिला टप्पा टाळण्यात आला आहे. जनगणनेसोबत होणारी नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) च्या अपडेशनलाही टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने ही माहिती लोकसभेमध्ये मंगळवारी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!