भारतात ओएलएक्सने दिला २५० कर्मचा़-यांना नारळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२ : वापरलेल्या, सेंकड हँण्ड वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्सने भारतातील २५० कर्मचा़-यांची कपात केली आहे. कंपनीतील अंतर्गत रणनितीमध्ये बदल करत असल्याचे कारण सांगण्यात आले आहे. या कपातीमुळे नोकरीवर गंडांतर आलेले सर्वाधिक कर्मचारी विक्री आणि मदत विभागातील आहेत.

ओएलएक्सच्या प्रवक्त्याने रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘कंपनीच्या धोरणांचा पुनर्आढावा घेताना आम्ही गेल्या आठवड्यात काही नवीन योजना आखल्या आहेत. या निर्णयामुळे आमच्या विक्री आणि मदत विभागातील २५० कर्मचा़-यांची कपात करावी लागली. हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देणार आहोत.

२००९ साली भारतात ओएलएक्सने व्यवसाय सुरू केला. भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि सतत वाढीसाठी आम्ही वचनबद्ध आहे. तसेच ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी स्थानिक पातळीवर गुंतवणूक करणे सुरू ठेवणार आहे. मात्र, सध्याचा काळ बिकट
असल्याचे कंपनी प्रवक्त्याने सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!