स्थैर्य, दि. १: प्रतिदिन 60,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा सलग पाच दिवस चाललेला कल कायम ठेवत, गेल्या चोवीस तासात भारतात 65,081 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 28,39,882 असून त्यानुसार कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर आणखी वाढून 77% झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3.61 पटीने जास्त आहे.
भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,85,996 असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20.53 लाखाहून जास्त आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चार पट वाढली आहे.
गेल्या 24 तासात पाच राज्यांमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. ती आकडेवारी पुढीलप्रमाणे :
- महाराष्ट्र -11,852
- आंध्रप्रदेश – 10,004
- कर्नाटक – 6,495
- तामिळनाडू – 5,956
- उत्तर प्रदेश – 4,782
या पाच राज्यांमधील रुग्णांची एकूण संख्या गेल्या 24 तासात देशभरात आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येच्या 56% आहे.
या पाच राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याचीही नोंद झाली असून ती संख्या देशभरातल्या 65,081 बरे झालेल्या रुग्णांच्या 58.4% आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 11,158 रुग्ण बरे झाले असून आंध्र प्रदेशात 8,772, कर्नाटकात 7,238 , तामिळनाडूत 6008, तर उत्तर प्रदेशात 4,597 कोविड रुग्ण बरे झाले आहेत.
वरील पाच राज्यांमध्ये मिळून गेल्या चोवीस तासात एकूण 536 मृत्यूची नोंद झाली असून देशभरात झालेल्या एकूण मृत्यूच्या संख्येच्या(819) तुलनेत हे प्रमाण 65.4% आहे. महाराष्ट्रात 184 मृत्यू नोंदवले गेले, तर कर्नाटकात 113 , त्याखालोखाल तामिळनाडूत 91, आंध्रप्रदेशात 85, तर उत्तर प्रदेशात 63 मृत्यूची नोंद झाली आहे.
माहितीसाठी तसेच तांत्रिक अडचणी, मार्गदर्शन आणि सूचनांसाठी कृपया नियमितपणे खालील संकेतस्थळाला भेट द्या- https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
covid-19 च्या संबंधात तांत्रिक शंकां निरसनासाठी [email protected] आणि इतर प्रश्नांसाठी [email protected] आणि @CovidIndiaSeva. इथे संपर्क करा.
कोविडसंबंधात कुठल्याही प्रश्नासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला खालील हेल्पलाईन नंबर वर फोन करा-+91-11-23978046 or 1075
कोविड संबंधित माहिती साठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे दूरध्वनी क्रमांक या संकेत स्थळावर मिळू शकतील:
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf