जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार हितापेक्षा भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या केंद्र सरकार विरोधार्थ घोषणांचा पाऊस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. २९ : नवीन कामगार विधेयक धोरण आणले आहे.त्यांनी केंद्रसरकारने  भांडवलदारांचे हित जोपासले आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात छेडण्यात आले.केंद्रसरकारच्या विरोधार्थ कार्यकर्त्यानी घोषणांचा पाऊस पडला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आं) जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जनरल कामगार युनियन’चे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ,ब्ल्यू फोर्स’चे जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ,सोमनाथ धोत्रे,अनिल उमापे,तालुकाध्यक्ष दीपक गाडे,शहराध्यक्ष जयवंत कांबळे,सचिन गंगावणे,राम लंकेश्वर, विशाल भोसले,प्रतीक गंगावणे आदी कार्यकर्त्यांसह तत्सम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्राच्या मनमानी कारभारामध्ये कामगारांसाठी असणाऱ्या  कायद्यामध्ये जी विधेयक मंजूर केली आहेत.कामगार व शेती विषयक विधेयक मंजूर केले आहे. त्याचा तिव्र निषेध राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी केला असून त्यांच्या आदेशानुसार केंद्राचा जाहीर निषेध करित आहोत. कामगाराच्या हितापेक्षा भाडंवलदारांचे हित जपण्याचे’च काम केंद्र सरकार करित आहे.कामगार विधेयकामध्ये कायमस्वरूपी कामगाराला कंत्राटी म्हणून ठेवण्याचा अधिकार कंपनी मालकाला देण्यात आला आहे.तसेच ३००’च्या वरील कामगारास मालक केव्हाही कपात करू शकतो.यामुळे कामगार व शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.घटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूरमंत्री असताना कामगार हिताचे कायदे केले होते. त्याची पायमल्ली केंद्र सरकार करीत आहे.निषेध म्हणून राष्टीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी याबाबत’चे पत्र राष्टृपती यांना दिले आहे. तरी या बाबीचा गांभीर्य पूर्वक विचार करावा.यासंदर्भात, संबंधितांना निवेदन सादर करण्यात आली आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!