
दैनिक स्थैर्य | दि. १२ जुलै २०२३ | सातारा |
सातारा शहरातील एसटी स्टँडसमोर पंजाब नॅशनल बँक या परिसरात अज्ञात तिघा चोरट्यांनी एकाला मारहाण करून त्याच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा मिळून सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सिकंदर जगन्नाथ पवार (वय ४३, रा. इस्लामपूर, जि.सांगली) यांनी अनोळखी संशयिताविरुध्द तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. ६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पाऊस आल्याने तक्रारदार बँकेच्या कट्ट्याजवळ थांबले होते. त्यावेळी अनोळखी तिघेजण तेथे आले. संशयितांनी तक्रारदार यांना मारहाण करत दहशत माजवली. या घटनेने तक्रारदार घाबरले. संशयितांनी तक्रारदार यांच्या अंगावरील सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरला. यानंतर संशयित तेथून पसार झाले.