दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज या स्वायत्त महाविद्यालयात २०२२-२३ ते २०२४ -२५ या तीन शैक्षणिक वर्षाकरिता मराठी अभ्यास मंडळ स्थापित झाले असून या मंडळाची पहिली बैठक नुकतीच दिनांक १६ जुलै २०२२ रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रा.डॉ.एन.डी.पाटील सभागृहात झाली. या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे असून या मंडळाचे सन्माननीय सदस्य म्हणून विद्यापीठीय मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.डॉ.अनिल सपकाळ, पुणे विद्यापीठ कक्षेतील अहमदनगर कॉलेज अहमदनगर येथील मराठी विभाग
प्रमुख प्रा.डॉ.सुधाकर शेलार,शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे प्रतिनिधी,शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.डॉ.नंदकुमार मोरे ,सातारयातील संगीत क्षेत्रातील मार्गदर्शक पंडित संजय दीक्षित, साताऱ्यातील रंगकर्मी मा.चंद्रकांत कांबिरे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे पदव्युत्तर विभागातील गुणवंत माजी विद्यार्थी व डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाळासाहेब चव्हाण, दैनिक सकाळ पुणे चे वरिष्ठ रिपोर्टर मा.मंगेश कोळपकर,छत्रपती शिवाजी कॉलेज मधील इंग्रजी विभागाच्या प्रमुख व संगीत विभागाच्या
समन्वयक उपप्राचार्या डॉ.रोशनआरा शेख, मराठी विभागातील डॉ.कांचन नलवडे,प्रा.गजानन चव्हाण, प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा.प्रियांका कुंभार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गठीत झालेल्या समितीतील उपस्थित सदस्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. छत्रपती शिवाजी कॉलेज या रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या कॉलेजची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली होती. इथला फलटण निवास परिसर हा कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर असल्याने मराठी अभ्यास मंडळातील नवीन सदस्यांनी इथला इतिहास समजून घेतला. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. बी.ए .भाग १ व एम.ए.भाग -१ च्या मराठी अभ्यासपत्रिका व मराठी विभागातर्फे सुरु असणारे अल्पमुदतीचे प्रमाणपत्र कोर्से, तसेच महाविद्यालयातील बी.ए.भाग -१ चा संगीत विषयाचा अभ्यासक्रम आणि अल्प मुदतीचा कोर्स या संदर्भात विचार विनिमय ,सूचना इत्यादी होऊन चर्चा होऊन अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले. संगीत विषयाचे तज्ञ म्हणून पंडित संजय दीक्षित यांनी मार्गदर्शन केले .विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान मंडळ यांचेकडून आलेल्या परिपत्रक वा सूचनेनुसार नवीन काही बदल करावयाचा असल्यास त्या संबधी
सदस्याशी संवाद करून अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुभाष वाघमारे यांना देण्यात आले. अभ्यासमंडळ बैठकीसाठी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा.गजानन चव्हाण ,डॉ.कांचन नलावडे, प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार यांनी व प्रशासकीय सेवक इत्यादींनी परिश्रम घेतले.