दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । बारामती । भाद्रपद बैल पोळा गेली दोन वर्षे पूर्ण मुळे रद्द झाला होता यंदा कोरोना नियंत्रणात असताना सण आनंदाने साजरा करण्यास शेतकरी आसुसलेला होता मात्र लम्पी रोगाने या आनंदावर विरजण पडले आहे, पण हार मानेल तो शेतकरी कसा? बऱ्हाणपूर ( तालुका बारामती) या गावातील शेतकऱ्यांनी चक्क गावातील 70 ट्रॅक्टर सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढून पोळ्याचा आनंद लुटला.
यांना भाद्रपद बैल पोळ्याच्या सणांमध्ये जनावरांमध्ये आलेल्या लम्पी रोगाचे सावट पडले.
रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावागावात बैलांच्या मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा अक्षरशः हिरमोड झाला होता मात्र बऱ्हाणपूर येथील भैरवनाथ तरुण मंडळ मधील युवकांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही रक्कम गोळा करून ट्रॅक्टर ची भव्य मिरवणूक गावातून काढली. रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळपासून शेतकरी व युवकांनी ट्रॅक्टर धुवून, रंगबेरंगी, रिबीन, फुगे यांनी सजवून व गुलाल भंडारा उधळून व डीजे च्या तालावर नाचत गावातील 70 ट्रकटरची भव्य मिरवणूक काढली या मध्ये बालकापासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्वानी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता भैरवनाथ मंदिर या ठिकाणी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले या प्रसंगी भैरवनाथ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.