बारामती मध्ये नवसाच्या वाघोबा ची परंपरा आजही कायम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । बारामती । सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी बारामती मध्ये शेकडो वर्षांची ताबूत मिरवणुकांची परंपरा जपली आहे.. कारागिरांची घटती संख्या, ताबूत तयार करण्यासाठी आणि बसविण्यासाठी मध्यवर्ती भागात जागा कमी होत असतानाही मुस्लिम बांधव उत्साहाने ताबुतांची परंपरा पुढे नेत आहेत.

ऐतिहासिक संदर्भांनुसार, बारामती शहरात मोहरममधील ताबूत मिरवणुकांना अनेक वर्षांची परंपरा आहे. सर्व धर्मांतील बांधव एकत्र येऊन , पूर्वीपासून ताबूत बसविण्यात योगदान देत आहेत. या वर्षीदेखील मोहरम महिना सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी ताबूत बसले आहेत. बारामती मध्ये पूर्वी ताबूत बसविणाऱ्यांमध्ये हिंदू बांधवांचा मोठा सहभाग होता. आजही शहरात १०० वर्षांहून अधिक इतिहास असलेले ताबूत बघायला मिळतात. मात्र, अलीकडे मध्यवर्ती शहरातील रिकाम्या जागा कमी होत आहेत. ताबूत तयार करणारे पारंपरिक कलाकार कमी होत आहेत. त्यामुळे ताबूत बसविण्यातील अडचणी वाढल्या आहेत.’

बारामती शहरांतील जुन्या पिढीतील ताबुतांना नवसाचा वाघोबा पाया पडण्यासाठी वाघोबांचा खेळ करणारे कै. दत्तात्रय कुलट त्यांच्या नंतर कै. नाथसाहेब कुलट आज चौथ्या पिढीतील अमोल कुलट यांनी आजही हिंदू -मुस्लिम धार्मिक सणाची परंपरा कायम ठेवली आहे.

आजोबांनी दिलेली शिकवण आणि संस्कार आम्ही आजही चालू ठेवले आहेत. तसेच ते पुढच्या पिढीला देणार आणि दरवर्षी वाघोबाची असलेली परंपरा कायम ठेवली जाईल असे त्यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांमध्ये मोहरम या महिन्याला विशेष महत्त्व आहे. हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या अनुयायांना येथे हौतात्म्य आले होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम बांधव मोहरम पाळतात. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी ताबूत आणि पंजाची पारंपरिक पद्धतीने स्थापना केली जाते.


Back to top button
Don`t copy text!