बारामती मध्ये ‘एन. आय. पी .एम. ची ‘ कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२३ । बारामती । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनेल मॅनेजमेंट पुणे विभाग यांच्या वतीने ‘मानव संसाधन व उपयोग आणि त्यावरील प्रभावी बदल ‘ याविषयी एक दिवसाची कार्यशाळा शनिवार २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली . आंतरराष्ट्रीय प्रेरक प्रशिक्षक अरुण सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी पुणे विभाग चेअरमन सदाशिव पाटील, सचिव प्रकाश बिमल खेडकर, बारामती विभाग चेअरमन खंडू गायकवाड, श्रायबर डायनॅमिक्स डेअरी चे प्लांट हेड हनुमंत जगताप, पियाजो व्हेकिलस चे एच आर हेड किरणकुमार चौधरी,बारामती मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व पुणे विभागातील विविध कंपनीचे ८५ प्रतिनिधी उपस्तीत होते. २१ व्या शतकाकडे जाताना एच आर व कार्पोरेट कंपनी क्षेत्रात म्हतपूर्ण बदल होत आहे यांचा अभ्यास करून नावीन्य पूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर करून त्या बदलास सामोरे जावे या साठी सक्षम राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे अरुण सिंग यांनी सांगितले. सद्या या क्षेत्रात नेमके कोणते बदल होत आहेत व त्याचे परिणाम काय होतील व त्यावरील उपाय काय आहेत या साठी कार्यशाळा चे आयोजन केल्याचे प्रकाश बिमल खेडेकर यांनी सांगितले. स्वागत व आभार भारत फोर्ज चे एच आर हेड व पुणे विभाग चेअरमन सदाशिव पाटील यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!