दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । आटपाडी । महागाई वाढविणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, शरद पवार साहेबांचा विजय असो, जयंत पाटील साहेबांचा विजय असो, ५० खोके एकदम ओक्के! भाजपा सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय ! अशा घोषणा देण्यात आल्या प्रचंड महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आटपाडीत आंदोलन करण्यात आले. पोलिस स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच नायव तहसिलदार यांना युवक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले.
अध्यक्ष सुरज पाटील यांचे नेतृत्वा खाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात
आले. प्रदेश युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख जिल्हाध्यक्ष विराजदादा नाईक यांच्या मार्गदर्शनाने सदरच्या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.
जीवनावश्यक वस्तू खाण्याचे पदार्थ, पेट्रोल डिझेल, गॅस यासह शेकडो वस्तूंच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीने सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी माता भगिनींचे दैनंदिन जगणे असह्य बनले आहे. आपल्याच धुंदीत वावरणाऱ्या उद्योगपती धार्जीण्या भाजपाच्या मोदी सरकारने या प्रचंड महागाईला पुरकच पावले टाकली आहेत. अनेक शासकीय संस्था मोडीत काढणाऱ्या या सरकारने लाखो रोजगार संपुष्टात आणले आहे. हजारो कोटींची उदयोगपतींची कर्जे माफ करणाऱ्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांकडे मात्र डोळेझाकच केली आहे. प्रचंड महागाईच्या विरोधात आज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महागाई विरोधातल्या घोषणा दिल्या
या आंदोलनात युवा उद्योजक अतुल पाटील, युवा नेते रोहित देशमुख, युवा नेते रणजित पाटील, कामत चे सरपंच परशुराम सरक, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत मोठे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांचे नेतृत्वाखाली पदाधिकान्यांनी नायब तहसिलदार यांना महागाईविरोधात निदर्शने करत मागण्यांचे निवेदन दिले.
सरचिटणीस नितीन डांगे, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, अतुल जावीर, सागर डोईफोडे दत्तात्रय रावळ, सुहास खंदारे, निलेश देशमुख, संजय पुजारी, सिध्देश्वर गायकवाड, अभिमान खिलारे, नामदेव आइवळे, भारत वायदंडे, संतोष वायदंडे हे मान्यवर सहभागी झाले होते. आटपाडीचे नायब तहसीलदार शिंदे यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.