
स्थैर्य, म्हसवड, दि. 19 : कुकुडवाड जवळच्या कारुंडेवाडी, ता. माण येथे कौठुंबिक वादातून पुतण्याने आपल्या चुलत्याचा सुरीने वार करुन निर्घ्रुण खुण केल्याची घटना घडली.
लक्ष्मण अण्णा चव्हाण (वय 50)रा. कारुंडेवाडी, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी संदीप वसंत चव्हाण(वय 26) हा घटनेनंतर फरार झाला असुन म्हसवड. पोलिस आरोपीचा तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मण चव्हाण, संदीप चव्हाण आणि त्याचे वडील वसंत चव्हाण हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत आहेत. यातील मयत लक्ष्मण व आरोपी संदिप यांच्यात सतत दारूच्या नशेत वादा वादी होत असे. अनेकवेळा चुलता व पुतण्यात मारहाण ही झाली होती.
साेमवारी दि. 18 रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना संदीप याने दारूच्या नशेत घरासमोर झोपलेल्या चुलता लक्ष्मण यांच्या गळ्यावर गाढ झोपेतच सुरीने सपासप वार करून तेथून पळ काढला.
लक्ष्मण यांना खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच ते मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस शिवारात शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक श्री. दिपक महामुनी यांनी भेट देऊन आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा ,अशा सूचना केल्या आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे करीत आहेत.