श्री निमजाई देवीस रामसाहेब निंबाळकर यांच्याकडून चांदीचे प्रभावळ अर्पण


दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
निंबळक (ता. फलटण) गावचे विकासात्मक, वैभवशाली नेतृत्व तसेच श्री निमजाई देवी एन्डोमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री. रामसाहेब निंबाळकर यांनी श्री निमजाई देवीस चांदीचे प्रभावळ अर्पण केले.

यापूर्वीही आदरणीय रामसाहेबांनी गावच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहून मदतीचा हात पुढे केला आहे. श्री. रामसाहेबांनी विकासात्मक गोष्टी व योजना राबवून निंबळक गावच्या वैभवात भर घातली आहे. नुकताच सुरू होत असणारा यात्रौत्सव दि. ११ व १२ एप्रिल रोजी या यात्रौत्सवात रामसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन निंबळकमध्ये करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!