
दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२२ | सातारा | केंद्र सरकारकडून राज्यातील ओबीसींचे हक्क हिसकवण्याच्या मुद्दामुन प्रयत्न केला जात आहे. केंद्राकडून राज्याला सापत्निक वागणुक वारंवार दिली जात आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण, ओबीसी समाजबांधवांवर वारंवार येत असलेले आर्थिक संकट, ओबीसी संघर्षाचा लढा यासह विविध बाबींसाठी मुंबईच्या बलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी भवनमध्ये दि. २५ मे रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, सोलापुरचे पालकमंत्री ना. दत्ता (मामा) भरणे, रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती (ताई) तटकरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली.
सर्व मंत्रीगणांच्या मार्गदर्शनापूर्वी ओबीसी घटकातील विविध समाज बांधव, पदाधिकारी यांच्यासोबत चर्चासत्र तसेच त्यांना उद्भवणार्या समस्या व आयत्यावेळी येणार्या विषयांवर चर्चाचत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदरील बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन मिलिंद नेवसे यांनी केले.