ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध कायम राहणार


स्थैर्य, मुंबई, दि.३०: ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता देशामध्ये शिरकावर केला आहे. देशात या नव्या प्रकाराचे 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाची भीती व्यक्त केली जातेय. खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या नवीन कोरोना व्हायरसमुळे ठाकरे सरकारने राज्यात 31 जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले आहेत. मात्र तरीही काही गोष्टींना अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबईची लाइफ लाइन म्हणजेच लोकलचाही समावेश आहे. तसेच लोकल लवकरच सुरू होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतचा निर्णय झालेला नाही.

याविषयी राज्य सरकारने अधिकृत आदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी आहेत असे सांगितले आहे. यासोबतच करोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी राज्यातील लॉकडाउन 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली जात असल्याची माहिती दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!