शालेय जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण : प्रा. रवींद्र कोकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 06 जानेवारी 2023 | बारामती | शालेय जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मातीतील खेळच आपले भविष्य घडवतात. सदृढ शरीर व मानसिक स्वास्थ्य लाभून आपला नावलौकिक टिकवता येतो. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सराव, एकाग्रता या पंचसूत्रीच्या जोरावर खेळात प्राविण्य प्राप्त होते; असे प्रतिपादन कथाकार व प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल व ज्युनि कॉलेज माळेगांव (बारामती) येथे आयोजित शालेय क्रीडास्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी “व्यक्तीमत्व विकास” या विषयांवर प्रमुख वक्ते प्रा. रवींद्र कोकरे  बोलते होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य हनुमंत चव्हाण, पर्यवेक्षक माने, शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. रवींद्र कोकरे यांनी विद्यार्थ्यांनी आपली नाळ माता ,मातीशी एकनिष्ठ ठेवल्यास यश पायाशी लोळण घेईल. खेळामध्ये खेळाडूवृत्ती ठेऊन जय पराजय न पाहता शिकत राहणे. सध्या खेळाडूना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

शालेय कब्बडी , खो खो, क्रिकेट, लिंबू चमचा, रांगोळी, धावणे, लांब उडी अश्या वैयक्तिक व सांघिक विजेत्यांना शालेय साहित्य बक्षीस  रुपात देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय पैठणकर व आभार एन एन शिंदे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!