दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने फलटण पंचायत समिती येथे सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने ग्राम स्तरावरील दाखले, जन्म नोंद दाखले, विवाह नोंद दाखले, मृत्यू नोंद दाखले, शौचालय दाखले, नमुना नंबर ८ उतारा, फेरफार नोंदणीचा निपटारा, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे, मागणी पत्र देणे यांच्यासह विविध दाखल्यांचे वितरण यावेळी करण्यात आले. फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून सेवा पंधरवड्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.
यामध्ये कोळकी, जाधववाडी (फलटण), विडणी, ठाकूरकी, फरांदवाडी ग्रामपंचायतीकडील नागरिकांचे प्राप्त अर्जानुसार दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच समाजकारण विभागाकडून दिव्यांग लाभार्थींना व्हीडीआयडी (अपंग) कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश कुंभार, विस्तार अधिकारी सुनील जगताप, आर. आर. भोसले, जी बी माने, एस एस गाढवे, समाज कल्याण, तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते