दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांचे निधन झाल्यानंतर उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या तब्येतीच्या कारणाने नव्याने करण्यात आलेले उपनगराध्यक्ष यांचे दालनाचा वापर सत्ताधारी गटाचे नगरसेवक करीत आहेत. याबाबतची तक्रार विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली होती. फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे यांनी उपनगराध्यक्ष यांचे दालन सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना बसण्यासाठी व कामकाज करण्यासाठी खुले करावे असे आदेश नगरपरिषद प्रशासनाला दिले. प्रशासनाने लगेचच कार्यवाही करत उपनगराध्यक्ष यांचे दालन सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांच्यासाठी खुले केले.
फलटण नगरपरिषदेमध्ये विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या साठी दुसऱ्या मजल्यावर विशेष दालन आहे. तिथे बसून विरोधी नगरसेवक कामकाज करू शकतात. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या तब्येतीच्या कारणाने त्यांचे दालन हे पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आलेले होते. नंदकुमार भोईटे यांच्या निधनानंतर त्यांच्या दालनामध्ये सत्ताधारी गटाचे नगरसेवक बसत आहेत व कामकाज करीत आहेत, असा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांनी सदरील दालन हे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांसाठी खुले करावे असे आदेश नगरपरिषद प्रशासनाला दिले. त्यामुळे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे दालन हे पुन्हा सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांच्यासाठी खुले करण्यात आलेले आहे.