दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सावंतवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील शेतजमिनीला केलेल्या तारकंपाऊंडमध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बेकायदेशीरपणे शेतीच्या तारकंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडून परप्रांतीयाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी नामदेव गुलाब माने (वय ५५, रा. सावंतवाडी, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम गणेश बेदिया (वय ३०, रा. बनवडी, ता. रांची, जि. रायगड, झारखंड, हल्ली राहणार सावंतवाडी, ता. फलटण) असे मयताचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे ४.०० ते सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत आरोपी युवराज गुलाब माने यांनी त्यांच्या मालकीच्या जमीन गट क्र. २/३ मधील शेतीमध्ये असलेल्या वाक्याच्या बाहेरील बाजूस लवचिक लोखंडी तारेला अनधिकृतपणे व बेकायदेशीररित्या विद्युत प्रवाह जोडून या तारेच्या कंपाऊंडचा इलेक्ट्रिक शॉक लागून यातील राम गणेश बेदिया (वय ३०, मूळ रा बनवली, जि. रामगड, राज्य झारखंड, सध्या रा. उपळवे, स्वराज साखर कारखान्याजवळ, सावंतवाडी, ता. फलटण) यास लागून तो मयत झाला.
या प्रकरणी अधिक तपास स.फौजदार व्ही. के. शिंदे करत आहेत.