दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । आटपाडी । शेतीच्या विविध पाणी योजनांसाठी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ३८५८ कोटी रुपयाच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी अन्यथा या सरकार विरुद्ध मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे राज्याचे नेते डॉ . भारत पाटणकर यांनी येथे बोलताना दिला . जवळे मल्टीपर्पज हॉल येथे आज संपन्न झालेल्या २९ व्या १३ दुष्काळी तालुक्यांच्या पाणी परिषदेत बोलताना डॉ भारत पाटणकर यांनी हा इशारा दिला .
चळवळीचा २९ वर्षाच्या कार्याचा, वेगवेगळ्या आंदोलनाचा उल्लेख करून अंतिम टप्प्यात आलेल्या शेतीच्या विविध पाणी योजनांसंबधी भाष्य करून महाविकास आघाडी सरकारने विविध पाणी योजनांसाठी उपलब्ध करून दिलेले अतिरिक्त आठ टीएमसी पाण्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे डॉ भारत पाटणकर यांनी अभिनंदन केले.
आटपाडी तालुक्यातील बंदिस्त पाईपलाईन ची उर्वरीत कामे तातडीने पुर्णत्वास न्या . तसेच वंचित गावे सांगोला,तासगांव, तालुक्यातील बंदिस्त पाईपलाईन च्या कामांना सुरुवात करा . समन्यायी पाणी वाटपाचा हा बंदिस्त पाईपलाईनचा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवला जावा असे ही डॉ .भारत पाटणकर यांनी स्पष्ट केले .
पाणी परिषदेचे निमंत्रक आनंदरावबापू पाटील यांनी, पाणी चळवळीच्या वाटचालीचा आढावा घेऊन पाणी योजनांची उर्वरीत कामे पुर्णत्वासाठी प्रखर आंदोलनाची गरज असल्याचे सांगीतले . डॉ भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखालील ही चळवळ मोठ्या ताकदीने सर्वत्र विस्तारली पाहीजे, वाढली पाहीजे . शेतकरी कष्टकऱ्यांच्या अभेदय एकजूट आणि पाणी चळवळीच्या माध्यमातूनच शेतीच्या पाण्याच्या सर्व योजना मार्गी लागणार आहे . असे ही त्यांनी सांगीतले .
* क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या स्मारकासाठी एक एकर जागा देणाऱ्या माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचे अभिनंदन करणेचा ठराव मंजूर करण्यात आली .
* पुर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने दुष्काळी भागासाठी ८ टीएमसी पाणी वाढवून दिले त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करणेत आला .
* शेतीच्या पाणी योजनांसाठी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले ३००० कोटीच्या निर्णयाला आत्ताच्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारने स्थगिती दिल्या बद्दल शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला .
* समन्यायी पाणी वाटपासाठी बंदिस्त पाईप लाईन ची शेताच्या बांधाच्या आत जाणारी यंत्रणा बळी प्रतिपदेपूर्व पुर्णत्वास न्या .
* पुर्ण वगळलेल्या गावांसाठी बंद पाईप यंत्रणा बसविण्याचे प्लॅन इस्टिमेट पूर्ण करून त्यासाठीचा निधी उपलब्ध करा .
* ही सर्व कामे आटपाडी आणि सांगोला तालुक्यामध्ये डिसेंबर २०२२ अखेर पुर्ण करा .
* प्रत्येक तालुक्याला वाढवून दिलेले पाणी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल अशी समान वाटपाची फेर आखणी करा .
* समन्यायी पाणी वाटपाचा बंदिस्त पाईपलाईनचा आटपाडी पॅटर्न महाराष्ट्रात सर्वत्र राबवा .
* पाणी वापरकर्त्याना विचारात न घेता बेकायदा पद्धतीने वाढविलेली पाणी पट्टी रद्द करा आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जनसुनावण्या घ्या . हे ठराव हात उंचावत पाणी परिषदेत मंजूर करण्यात आले .
यावेळी कॉ . संपत देसाई, काँ जयंत निकम, सुशांत देवकर विटा, प्रदिप पाटील सर, सादिक खाटीक, आटपाडी, जे . के . जॉय, बाळासाहेब रास्ते कवठेमहंकाळ, हभप तुकाराम महाराज जत, विठ्ठल डांगे खटाव, शशिकांत डांगे कवठेएकंद तासगांव, मोहनराव यादव कडेपूर कृष्णा पाटील तासगांव, गणेश बाबर चोपडी, सुरेश कदम माण, आनंदराव शेंडे तडवळे यांची भाषणे झाली .
साहेबराव चवरे यांनी विविध ठरावांचे वाचन करून त्यांस हात उंचावून सर्वांची संमती घेतली .
प्रारंभी क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी आणि क्रांती विरांगणा इंदूताई पाटणकर यांच्या प्रतिमांना सर्वांनी अभिवादन केले .
यावेळी पंचायत समिती आटपाडीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, दिघंची जि.प. गटाचे नेते जनार्धन झिंबल, हभप बबनबापू क्षिरसागर, आवळाई चे सरपंच बाबासाहेब जाधव, शेटफळेचे महादेवदाजी देशमुख, विजय पुजारी खरसुंडी, गजानन गायकवाड चिंचाळे, शिवाजी बाबर चोपडी, नाथाजी बाड, प्रा .संजय कांबळे कवठेमहंकाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.