
दैनिक स्थैर्य । दि. १८ नोव्हेंबर २०२२ । सांगोला । श्रद्धा वालकर या हिंदू युवतीचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा लव्ह जिहाद विरोधी कायदा व धर्मांतर विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे सांगोला येथे तहसीलदार यांना गुरुवार १७ नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वश्री गणपत कुमार, घेवाराम, लक्ष्मण चौधरी, महेश चौधरी, डॉक्टर मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, विकास गावडे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर उबाळे, सागर मोहिते, नवनाथ कावळे, प्रमोद ढोले, ओंकार कुलकर्णी, नवनाथ चव्हाण, संतोष पाटणे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिल्लीतील आफताब पुनावाला हा नराधम मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लिव इन मध्ये राहत होता. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यावर आफताबने तीचे 35 तुकडे करत निघृणपणे हत्या केली. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेतून लव्ह जिहादी आफताबची वासनांधता क्रूरता आणि विकृत मानसिकता दिसून येते. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ही केवळ पहिली घटना नसून काही दिवसापूर्वी मुंबईतील टिळक नगर येथे राहणारी रूपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तिचा पती इकबाल मोहम्मद शेख ने तिची गळा चिरून हत्या केली होती. अशा घटना कोल्हापूर, मालेगाव, अमरावती सह राज्यभरात उघडकीस आल्या आहेत. एकूणच राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहाद ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. खोटे नाव, खोटी ओळख सांगणे, फसवणे, महागडी गिफ्ट देणे, राहणीमान चांगले दाखवणे आदी अनेक माध्यमातून हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरण करण्यात येते त्यानंतर त्यांच्याशी निकाह केला जातो. यामध्ये हिंदू युवतींचे भयंकर शोषण केले जाते. तरी या अत्यंत गंभीर समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत
1. लव्ह जिहादी नराधम आफताबला तात्काळ फासावर लटकवावे.
2. या हत्तेचा तपास करताना हत्या करण्याचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. नराधम आफताबने आणखी काही मुलींना प्रेमाने जाळ्यात ओढल्याची माहिती आहे त्या प्रकरणांची ही चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी.
3. राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही षडयंत्र नाही ना, या मागे लव्ह जिहाद चा प्रकार तर नाही ना याची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमावे.
4. राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरणबंदी कायदा लागू करावा.
5. लव्ह जिहाद प्रकरणे हाताळण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी अशा प्रकरणांमध्ये लव्ह जिहाद च्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत
6. लव्ह जिहादसाठी विदेशातून होणारा अर्थ पुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांची शासनाने चौकशी करावी आणि त्याचा सापडलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी.
7. लव्ह जिहाद प्रकरणात मदरसे, मशिदी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.