स्थैर्य, फलटण, दि. २२ : फलटण तालुक्यामधील डोंबाळवाडी, निंभोरे व विडणी हद्दीमधून जात असलेला नीरा उजव्या कालव्यामध्ये पाण्याचा पाझर मोठ्या प्रमाणावर आहे. तरी डोंबाळवाडी, निंभोरे व विडणी हद्दीमधून जात असलेला नीरा उजव्या कालव्याची भरावा दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली. त्यावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सदरील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जलसंपदा खात्यास दिले.
पुणे येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, या कालव्यांच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार बोलत होते. बैठकीत सोलापूरचे पालक मंत्री ना. दत्तामामा भरणे, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, शहाजी पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, राम सातपुते, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.