दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । सोलापूर । विद्यापीठाच्या नियमानुसार पारंपारिक पद्धतीने परीक्षा घेतल्यानंतर 40 दिवसाच्या आत मध्ये निकाल जाहीर करण्यात येतो. चालू शैक्षणिक वर्षात मार्च २०२२ या परीक्षेमध्ये पारंपारिक परीक्षा पद्धती ऐवजी OMR सीटवर परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत मध्ये सर्व रिझल्ट जाहीर करण्यात येते असं परीक्षा नियंत्रक डॉक्टर शिवकुमार गणपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र अनेक परीक्षा होऊन ४५ दिवस उलटून गेलेत तरी सुद्धा निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीत. निकालाबाबत विचारला असता परीक्षा नियंत्रक म्हणतात की आज निकाल लागून जाईल.
अनेक व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जॉब आहे मात्र निकाल जाहीर झाल्या नसल्याने त्यांच्या नियुक्ती रखडलेले आहेत जर वेळ निकाल लागला नाही आणि त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झालं त्याला सर्वस्वी जबाबदार कुलगुरू आणि परीक्षा विभाग असेल.
परीक्षेत हजर निकालात गैरहजर
याच प्रमाणे बी.ए व बी.कॉम भाग दोन व तीन या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून पण यात सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असताना काही विद्यार्थी परीक्षेस अनुउपस्थित असल्याचे दाखविण्यात आले. असे एक किंवा दोन विद्यार्थ्यांसंदर्भात झालेली नाही. शेकडो विद्यार्थ्यांसंदर्भात झालेली आहे. विद्यार्थी सगळ्या विषयाच्या परीक्षेस बसलेला असताना त्यांची एखाद्या विषयाच्या परीक्षेस अनुपस्थिती म्हणून दाखवताय आणि त्याला त्या विषयात फेल करताय म्हणजे यामध्ये असे दिसते महाविद्यालय व विद्यापीठ परीक्षा विभागाची किती निष्काळजीपणा आहे. हे यातून दिसून येते. यामध्ये वालचंद, वसुंधरा, दयानंद, ए.आर.बुर्ला व इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदार घेऊन विद्यापीठ प्रशासन म्हणून कुलगुरू मॅडम व परीक्षा विभाग यांनी तात्काळ दोन दिवसात संबंधित विषयांचे फेर निकाल जाहीर करावे.
विद्यापीठातील विद्यार्थी हॉस्टेल संदर्भात संबंधित हॉस्टेल रेक्टर राऊत श्रीराम व नितीन मुदफाने यांच्याकदून फोन द्वारे चौकशी केली असता त्यांच्याकडून टाळाटाळची उत्तरे मिळाली आहे.
प्रमुख मागण्या आणि प्रश्न :-
१) निकाल जाहीर करायला एवढा वेळ का होत आहे ?
२) पदवी परीक्षेचे निकाल लागण्या अगोदर मास्टर डिग्री प्रवेश प्रक्रिया कशाच्या आधारे पूर्ण करण्यात आली ?
३) ज्या युजीसीच्या पत्राच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली गेली असं परीक्षा नियंत्रक म्हणतात ते पत्र सार्वजनिक करण्यात याव.
४) विद्यापीठ परिसरातील मुलां मुलींच्या वस्तीगृहाची प्रवेश नोटीस का जाहीर करण्यात आली नाही ?
५) वस्तीगृह प्रवेशाची अधिकृत नोटीस जाहीर करून मेरिट लिस्ट वेबसाईटवर प्रकाशित करण्यात यावी
६) BA व Bcom भाग दोन व तीन या विद्यार्थ्यांचे फेर निकाल तात्काळ जाहीर करा
७) परीक्षा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी
८) एम ए , M.COM MSc च्या ४ थ्या SEM चे निकाल जाहिर का केले नाहीत ?
९) परीक्षा आणि निकाल या पेक्षा विद्यापीठाला सिनेट निवडणुका महत्वच्या वाटतात का ?
१०) प्राधान्य कशाला परीक्षा निकाल की युवा महोत्सव?
सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. परीक्षेच्या काळात सुद्धा प्रचंड गोंधळ उडालेला आपण पाहिलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना एक ते दोन तास उशिरा पेपर देण्यात आले होता. एका विषयाच्या पेपरमध्ये तर हाताने लिहिलेला पेपर देण्यात आला होता. आणि आता 47 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा निकाल जाहीर करण्यात येत नाही. यावरून आमचा हे लक्षात येते की कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचे विद्यापीठ प्रशासन व्यवस्थेवर लक्ष नाही. आणि परीक्षा नियंत्रक परीक्षा घेण्यात आणि निकाल जाहीर करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत. या दोघांनी तात्काळ राजीनामे द्यावेत व विद्यार्थ्यांचे जाहीर माफी मागावी. असे मागणी संघटना करीत आहे. आणि वरील सर्व प्रश्न दोन दिवसात मार्गी लावण्यात यावे अन्यथा SFI विद्यापीठावर तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हा अध्यक्ष अतुल फसाले व जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आपले
अतुल फसाले मल्लेशम कारमपुरी
जिल्हा अध्यक्ष जिल्हा सचिव