
स्थैर्य, मुंबई, दि.२३: झोपडपट्टीवासियांच्या/SRA च्या जागेचा गैरव्यवहार करणा-या मुंबईच्या महापौरांवर ताबडतोब कारवाई व्हावी, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप नेते डॉ किरीट सोमैया यांनी केली आहे.
2006/2008 मध्ये मूळ लाभार्थ्यांना सदनिका गोमाता जनता (SRA), सोसायटी, गणपतराव कदम मार्ग, वरळी येथे देण्यात आल्या. बिल्डिंग क्रमांक 2 मधील 601 हा गाळा अलोट करण्यात आला होता. त्यात कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवारांचे नाव नव्हते.
(A) हा गाळा महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्यांच्या नावाने देण्यात आला आहे परंतु, त्या गाळयावर गेली 8 ते 10 वर्षे कब्जा महापौर मा. किशोरीताई पेडणेकरांचा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पण आपल्या घराचा पत्ता हाच दिला आहे.
(B) येथे याच बिल्डिंग क्र. 1 मधील तळमजला, गाळा क्र. 4 ही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. परंतु हा गाळा पण किशोरीताई पेडणकर परिवाराच्या ताब्यात किश कॉपोरेशनचे कार्यालय म्हणून आहे.
महापौरांनी स्वत: स्थापित केलेले किश कॉपोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. गेल्या आठवड्यात मी स्वत: तसेच, SRA अधिकाऱ्यांनीही भेट दिली व पाहणी केली. या रहिवासी जागेचा व्यावसायिक उपयोग करण्यात येत आहे.
यापैकी बिल्डिंग क्र. 1, तळमजला, येथे रहिवाशी उपयोगाचे प्रमाणपत्र/Permission होती/आहे. त्यावर या सदनिका लाभार्थींना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही.
मुंबईचे महापौर व त्यांचा परिवार याचा गैरकायदेशीररित्या व्यावसायिक वापर करत आहेत, त्यावर महापालिका व SRA नी अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही, ताबडतोब कारवाई करावी.
2013 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली व कंपनी कार्यालयात रजिस्ट्रेशनसाठी अधिकृतरीत्या महापौर/परिवारांनी हा पत्ता व्यावसायिक कार्यालय म्हणून दिला आहे.
महापौर अशा गैरकायदेशीर कृत्यात सहभागी/सामील आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हे अभिमानाने सांगितले आहे.
१. मी गोमाता जनता सहकार मध्ये तळमजल्याच्या 2 सदनिका जागेवर आमचे कंपनीचे कार्यालय व व्यवसाय चालवते.
२. गोमाता जनता सहकारी, बिल्डिंग क्र. 2, सदनिका क्र. 601 महेश लक्ष्मण नरमुल्ला यांची सदनिका रहिवासी कामासाठी वापरते.
३. या दोन्ही जागा मी गेली अनेक वर्षे भाड्याने वापरते, यासंबंधी करारही केला आहे व नियमितरित्या गेले 8 ते 12 वर्षे याचा वापर करते व भाडे देते.
झोपडपट्टीवासियांना/लाभार्थींना या सदनिका देण्यात आल्या आहेत, त्या भाड्याने वापरता येत नाही, तसा करारही करता येत नाही. महापौर स्वत: असे गैरकायदेशीर कृत्य व करार करतात. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
बिल्डिंग क्र. 1, तळमजल्यावर आणखी बेनामी आठ कंपन्यांचे गैरकायदेशीर रित्या रजिस्टर
करण्यात आल्या आहेत त्यावरही कारवाई करावी.
तसेच रजिस्टर ऑफ कंपनी भारत सरकार येथे महापौर महोदया/परिवारांनी बनावट (Forgery) करून खोटे डिक्लरेशन केले आहे, कंपनीचे रजिस्ट्रेशन प्राप्त केले आहे यावरही कारवाई व्हावी.