इम्मानुएल फाऊंडेशनतर्फे फलटणमध्ये ख्रिस्त जन्म सोहळा उत्साहात; शेकडो भाविकांची उपस्थिती


पास्टर जोसेफ वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; १० डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘कॅरल सिंगिंग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

स्थैर्य, फलटण, दि. २८ डिसेंबर : प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात ख्रिसमस (नाताळ) फलटणमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोळकी (ता. फलटण) येथील महादेव मळा येथे इम्मानुएल फाऊंडेशनच्या वतीने २५ डिसेंबर रोजी ‘ख्रिस्त जन्म स्मरण सोहळा महोत्सव २०२५’ मोठ्या भक्तीभावाने आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी शेकडो ख्रिस्ती समाजबांधव उपस्थित होते.

इम्मानुएल फाऊंडेशनचे पास्टर जोसेफ वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथे प्रभू येशूंच्या जन्मानिमित्त विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना नाताळच्या आणि आगामी नवीन वर्षाच्या (२०२६) शुभेच्छा दिल्या.

ख्रिसमस निमित्त फाऊंडेशनच्या वतीने १० डिसेंबर २०२५ पासूनच विविध कार्यक्रमांचे आणि ‘कॅरल सिंगिंग’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १० ते २३ डिसेंबर या कालावधीत सी. प्रभा पाटील, सी. संगीता शिंदे, वाठार स्टेशन विभाग, मलठण विभाग, ब्र. आवारे, सी. मलकु आजी, बारामती कॅरल ग्रुप, सी. प्रज्ञा, ब्र. नरुटे, ब्र. सचिन, सी. सोनम आणि सी. सुषमा यांनी कॅरल सिंगिंगद्वारे सुवार्ता प्रसार केला.

तसेच १२ डिसेंबर रोजी वाठार स्टेशन येथे ख्रिस्त जन्मोत्सव आणि २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बारामती येथेही विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोळकी येथील मुख्य कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा झाला.


Back to top button
Don`t copy text!